संस्कृती प्रबोधनाच्या गाभ्याचे बहुआयामी चिंतन ‘यथार्थ’मधून आले आहे
कवी, ज्येष्ठ साहित्यिक, संपादक, समीक्षक, वक्ते, संवाद माध्यमशास्त्रातील तज्ज्ञ आणि सांस्कृतिक-वाङ्मयीन चळवळीचे उद्गाते म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या गौरवार्थ ‘यथार्थ’ या गौरवग्रंथाचे नुकतेच प्रकाशन झाले. जोशी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते लेखक कार्यकर्ता आहेत. त्यांची व्यापक व समग्र जीवनदृष्टी जीवनाच्या अनेक घाटांतून, माध्यमांमधून कृतिशीलरीत्या व्यक्त होते.......